बेळगाव / प्रतिनिधी

शहापूर येथील बॅरिस्टर नाथ पै चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे सोमवारी सायंकाळी श्रींच्या मंडपात,खासबाग येथील क्रांती महिला मंडळाच्या भगिनींनी सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाने वातावरण चैतन्यमय बनविले .

या कार्यक्रमात क्रांती महिला मंडळाच्या शारदा भेकणे, मंदा माळवी, कल्पना पवार, कविता पवार, रुक्मिणी पाटील, लता माळवी, उज्वला नाकाडी, संगीता पठाडे, सविता बिर्जे, सुनीता मालवणकर व अन्य भगिनींनी सुरेल स्वरात अथर्वशीर्ष पठण करुन वातावरण मंगलमय बनविले. अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाला परिसरातील महिलांनीही उत्स्फूर्त सहभाग दर्शविला. यावेळी क्रांती महिला मंडळाच्या ज्येष्ठ भगिनी मंदा माळवी यांचा भारती विजय सामजी यांच्या हस्ते शाल, पुष्प आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. दरम्यान उद्या बुधवारी श्रींच्या आरतीनंतर भारत नगर शहापूर येथील श्री भक्ती महिला मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे.