बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे दिवंगत अध्यक्ष दीपक दळवी यांच्या कुटुंबीयांना सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्याचे आमदार रोहित आर.पाटील यांनी भेट देऊन सांत्वन दिले.
मागील महिन्यात दीर्घकालीन आजारानंतर दीपक दळवी यांचे निधन झाले होते. या दु:खद प्रसंगात आमदार पाटील यांनी दळवी यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांची विचारपूस केली आणि त्यांना धीर दिला.
या भेटीत बुलंद दळवी, विनोद हंगिरकर, दिंगबर पवार, सागर पाटील, रमेश रायजादे, लक्ष्मण नाईक, कुणाल दळवी आणि अनिल पाटील आदी कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी दिवंगत दीपक दळवी यांनी सीमाभागातील मराठी जनतेसाठी केलेल्या कार्याची आठवण उपस्थितांनी सादर केली.








