बेळगाव / प्रतिनिधी
वाणीश्री फिल्म प्रोडक्शन निर्मित बेळगाव यांच्या 27 जून पासून सर्वत्र प्रदर्शित होणाऱ्या ‘ऑल इज वेल’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चित्रपटाचे सर्व कलाकार, दिग्दर्शक आणि निर्माते मंगळवार दिनांक 24 जून रोजी बेळगाव शहराला भेट देणार असून त्यांची बेळगाव शहरात विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. वाणीश्री फिल्म प्रोडक्शन चे निर्माते अमोद मुचंडीकर आणि वाणी हल्लप्पनवर या बेळगावच्या कलाकारांनी ऑल इज वेल या चित्रपटाची निर्मिती केली असून हा चित्रपट 27 पासून सर्वत्र प्रदर्शित होत आहे आणि बेळगाव मध्येच प्रथमच सर्व कलाकार येत आहेत.
बेळगाव येथील ज्योती कॉलेज क्लब रोड, मराठा मंडळ पॉलिटेक्निकल कॉलेज नेहरुनगर, मराठा मंदिर हॉल गोवावेस बेळगाव येथे चित्रपटातील कलाकार सयाजी शिंदे, प्रियदर्शन जाधव, अभिनय बेर्डे, रोहीत हळदीकर, नक्षत्रा मेढेकर, सायली फाटक, अमायरा गोस्वामी, दिग्दर्शक योगेश जाधव, कार्यकारी निर्माता संजय ठुबे, निर्मिती नियंत्रक विनय जवळगीकर आदी उपस्थित राहणार आहेत.