येळ्ळूर दि. १० : महावीरनगर उद्यमबाग येथे भाडोत्री घरामध्ये आजीसह राहणाऱ्या व आई – वडील असून देखील गेल्या चार वर्षापासून आजीकडे सोडून गेलेल्या मुलाला आशादीप वेल्फेअर सोसायटीतर्फे रू. ५०००/- व शैक्षणिक साहित्य बरोबरच अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.

वास्तविक पाहता या मुलाचा सांभाळ करण्यासाठी त्याची आजी ऑफिसमध्ये फरशी पुसण्याच्या कामापासून घरोघरी मोलकरणीचे काम करून नातवाच्या व आपल्या पोटाची खळगी भरत असते. ही बाब आशादीप वेल्फेअर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष व अभियंते हणमंत कुगजी व त्यांच्या पत्नी सौ. उज्वला कुगजी यांच्या कानी पडताच, हे दाम्पत्य त्या आजीच्या मदतीला धावले तिला नातवाच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी घेण्याची ग्वाही देऊन धीर दिला.

अभियंते हणमत कुगजी यांनी आत्ताच झालेल्या गणेशोत्सवामध्ये विराट गल्ली येळ्ळूर येथील युवकांना डॉल्बी सारख्या कर्कश आवाजापासून दूर राहून पारंपरिक वाद्याचा उपयोग करून गणरायाचे आगमन करण्यासाठी ३१ हजार रुपयाची देणगी देखील दिली.