बेळगाव / प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून बेळगाव शहर परिसरात संततधार पाऊस सुरु आहे. परिणामी अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडत आहेत. दरम्यान आज सोमवारी ताशिलदार गल्लीतील विलास जुवेकर यांच्या घराची भिंत कोसळून नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पावसाच्या वाढलेल्या जोराने मातीच्या घराच्या भिंती कोसळू लागल्या आहेत अशा लहान मोठ्या नुकसानाला देखील शासनाने नुकसान भरपाई देण्याची गरज आहे.