मण्णूर / वार्ताहर
गणेशोत्सव मोठ्या उत्साह आणि मंगलमय वातावरण साजरा केला जात आहे. शहराबरोबरच बेळगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातही श्री गणेशाची मोठ्या थाटात स्थापना करण्यात आली आहे. गणेशोत्सवानिमित्त गावातील घरोघरी आकर्षक आरास करण्यात आली आहे. यानिमित्ताने आंबेवाडी घळगेश्वर गल्ली येथील ओमानी भावकू तरळे यांच्या निवासस्थानी साकारलेल्या जगन्नाथ मंदिराच्या आकर्षक देखाव्याची सध्या पंचक्रोशीत चर्चा आहे.








