• दोनशेहून अधिक लोकांनी घेतला शिबीराचा लाभ

मण्णूर : मातोश्री सौहार्द सोसायटी मण्णूर आणि केएलई हॉस्पिटल बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य तपासणी व नेत्र शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबीराचा एकूण २०० हून अधिक लोकांनी लाभ घेतला.

नेत्र तपासणी शिबीरात जवळपास ५५ लोकांना मोतीबिंदू दोष आढळून आला असून पुढील आठवड्यात मातोश्री सौहार्द सोसायटी मण्णुर आणि केएलई हॉस्पिटल बेळगाव यांच्यातर्फे सर्व रुग्णांचे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शिबिरात मातोश्री सौहार्द सोसायटीचे चेअरमन आर. एम. चौगुले, व्हॉईस चेअरमन, संचालक मंडळ कर्मचारी त्याचप्रमाणे केएलई हॉस्पिटलचे डॉक्टर उपस्थित होते.