बेळगाव : सार्वजनिक वाचनालय, बेळगाव या संस्थेच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही संगीत भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे हे स्पर्धेचे नववे वर्ष असून रविवार दि. १७ ते मंगळवार दि.१९ ऑगस्ट २०२५ या कालावधीत मराठा मंदिर येथे होणाऱ्या या स्पर्धेत महिला गटात १९ आणि पुरुष गटात १२ अशा एकूण ३१ भजनी मंडळांनी भाग घेतला आहे.
या स्पर्धांचे उद्घाटन रविवारी दुपारी १२ वा. ह. भ. प. दत्तू जट्टेवाडकर बेळगाव यांच्याहस्ते होणार आहे. यंदाची ही स्पर्धा प्रथम महिला गट आणि नंतर पुरुष गट अशा पद्धतीने घेतली जाणार आहे.
पहिल्या दिवशी दैवज्ञ महिला भजनी मंडळ शहापूर, श्री मंगाई महिला भजनी मंडळ वडगांव, मुक्त ग्रुप महिला भजनी मंडळ टिळकवाडी, संत मुक्ताई महिला भजनी मंडळ भारतनगर, ज्ञानेश्वर माऊली महिला भजनी मंडळ, मण्णूर, विठू माऊली महिला भजनी मंडळ बसुर्ते, श्री महालक्ष्मी सांप्रदायिक महिला भजनी मंडळ केदनूर, भक्ती सांस्कृतिक महिला भजनी मंडळ बापट गल्ली, श्री स्वामी समर्थ महिला भजनी मंडळ किणये ,जय सातेरी महिला भजनी मंडळ ,करंजगाव (ता. चंदगड), जय हरी महिला भजनी मंडळ राजहंसगड आणि श्री माता अन्नपूर्णेश्वरी दैवज्ञ महिला भजनी मंडळ, शहापूर असे बारा भजनी मंडळ आपली कला सादर करणार आहेत.
सर्व बारा भजनी मंडळांनी दुपारी बारा वाजता मराठा मंदिर येथे उपस्थित रहावे. तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भजनांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन सार्वजनिक वाचनालय तर्फे करण्यात आले आहे.