• येळ्ळूर येथील खळबळजनक घटना

बेळगाव / प्रतिनिधी

पाचशे रुपये परत न करणाऱ्या मित्राशी एका मित्राचे भांडण झाले आणि त्याच्या आईच्या उपस्थितीत त्याची हत्या करण्यात आली. बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर गावात ही घटना घडली. हुसेन ताशेवाले (४५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. आरोपी मिथुन कुगजी आणि मनोज इंगळे यांनी ही हत्या केल्याचे सांगितले जाते. भंगार साहित्याच्या मुद्द्यावरून मित्रांमध्ये भांडण झाल्याचे समजते.

मृत हुसेन हत्या केलेल्या आरोपी मिथुन आणि मनोजला पाचशे रुपये द्यायचे होते असे सांगितले जाते. दोघेही पैसे मागण्यासाठी हुसेनच्या घरी गेले होते. यादरम्यान तिघांमध्ये हाणामारी झाली. यादरम्यान दोन्ही आरोपींनी हुसेनच्या पोटात मुक्का मारला. पोटात जोरदार मार लागल्याने हुसेन गंभीर जखमी झाला, असे म्हटले जाते आहे.

जखमी हुसेनला बीम्स रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले. मात्र उपचारात यश न आल्याने हुसेनचा रुग्णालयात मृत्यू झाला. बेळगाव ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. ही घटना बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.

मिथुन कुगजी हा सराईत गुन्हेगार असून काही वर्षांपूर्वीही अनगोळ तलावाकडे देखील फक्त दोनशे रुपयासाठी एकाचा खून केला होता. मिथुन कुगजी याच्यामुळे येळ्ळूर गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी येळ्ळूर गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.