• पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखवला हिरवा झेंंडा

बेंगळुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेंगळुरू येथे एका विशेष समारंभात तीन वंदे भारत एक्सप्रेसना हिरवा झेंडा दाखवला. मोदींनी केएसआर बंगळुरू ते बेळगाव वंदे भारत एक्स्प्रेसला बंगळुरू रेल्वे स्थानकावर हिरवा झेंडा दाखवला.
यानंतर पंतप्रधान मोदींनी श्री माता वैष्णोदेवी कटरा ते अमृतसर वंदे भारत एक्स्प्रेस आणि नागपूर (अजनी) ते पुणे वंदे भारत एक्स्प्रेस या दोन गाड्यांना ऑनलाईन पद्धतीने (व्हिडीओ कॉन्फरन्स) हिरवा झेंडा दाखवला. या व्यतिरिक्त पंतप्रधानांनी बंगळुरूच्या बहुप्रतिक्षित येलो मेट्रो लाईनलाही हिरवा झेंडा दाखवला.

केएसआर बंगळुरू ते बेळगाव वंदे भारत एक्स्प्रेस बेंगळुरू, धारवाड, हुबळी, हावेरी, दावणगेरे, तुमकूर, यशवंतपूर आणि बेळगाव येथे थांबणार आहे.कर्नाटकातील बेळगाव – बेंगळुरू वंदे भारत एक्स्प्रेस राज्याच्या उत्तर आणि दक्षिण भागांदरम्यान जलद आणि अधिक आरामदायी प्रवासाची सुविधा देईल. ही गाडी क्रमांक 26751 बेळगाव-केएसआर बेंगळुरू आणि 26752 केएसआर बेंगळुरू – बेळगाव या क्रमांकांनी धावेल.

ही सेवा आठवड्यातून सहा दिवस (बुधवार वगळता) चालेल. सकाळी ५.२० वाजता बेळगाववरून सुटेल आणि दुपारी १.५० वाजता बेंगळुरूला पोहोचेल. परतीच्या प्रवासात, दुपारी २.२० वाजता सुटेल आणि रात्री १०.४० वाजता बेळगावला पोहोचेल.

प्रमुख थांबे : यशवंतपूर, तुमकुरु, देवणगेरे, हावेरी, हुबळी आणि धारवाड. या मार्गावरचे भाडे सीसी साठी ₹१,५७५ आणि एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी ₹२,९०५ असे निश्चित केले असून यात केटरिंग शुल्क समाविष्ट आहे.