बेळगाव : उद्यमबाग येथील प्रख्यात उद्योजक तथा बेळगावचे माजी महापौर, स्वामी विवेकानंद नगरातील सिद्धिविनायक मंडळाचे विश्वस्त,सार्वजनिक वाचनालयाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक असलेले श्री. गोविंदराव महादेवराव राऊत (वय ७८) यांचे शनिवारी सायंकाळी ७.३० वा. अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, दोन विवाहित कन्या, जावई व नातवंडे असा परिवार आहे. रविवारी सकाळी ९.३० वाजता मॅंगो मिडोज, उद्यमबाग येथील निवासस्थानावरून त्यांची अंत्ययात्रा निघणार असून शहापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
January 24, 2026
आता मद्यपी चालकांवरही दाखल होणार गुन्हा बेळगाव / प्रतिनिधी बेळगाव जिल्ह्यात गांजा विक्री आणि सेवनाला पूर्णपणे आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने कंबर कसली आहे. यासाठी सर्व […]








