बेळगाव / प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण यांच्यावतीने वंटमुरी कॉलनी येथील माताशिशु रुग्णालयात पोषण आहार किट वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे नेतृत्व अध्यक्षा ॲड. विजयलक्ष्मी मण्णीकेरी यांनी केले. सचिव कावेरी करूर आणि कार्यक्रम समन्वयक डॉ. श्रीदेवी रेवण्णावर यांनी स्वागत केले. या कार्यक्रमात गरजू माता व बालकांना पोषण आहार किटचे वाटप करण्यात आले. तसेच आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली. यावेळी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. प्रचिती उदयकुमार, डॉ. स्फूर्ती मास्तीहोळी, सुरेखा मुम्मीगट्टी, लक्ष्मी चवळी, वरिष्ठ परिचारिका ग्लॅडिस यांच्यासह रोटरी दर्पणच्या सदस्या उपस्थित होत्या.