बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या सौजन्याने लिटिल चॅम्प्स इंटरॅक्ट क्लबचा स्थापना समारंभ स्ट. जर्मेन इंडियन हायस्कूलमध्ये उत्साहात पार पडला. या समारंभाला मुख्य अथिती म्हणून रोटेरियन ॲड. विजयलक्ष्मी मण्णिकेरी, अध्यक्ष रोटेरियन उदय इडगाळ व मुख्याध्यापक श्री. गिरीश पुराणिकमठ आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी रोटेरियन ॲड. विजयलक्ष्मी मण्णिकेरी यांनी विद्यार्थ्यांना नेतृत्व व सेवा याबद्दल प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

यावेळी २०२५ – २६ या वर्षासाठी निवड आलेल्या नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यामध्ये इंटरॅक्टर झैद मो. ए. शेख यांची अध्यक्ष तर इंटरॅक्टर समीक्षा वंटमुरी यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना रोटेरियन कावेरी करूर (क्लब सचिव), रोटेरियन कोमल कोळिमठ (नवपीढी संचालक) व रोटेरियन पुष्पा पर्वतराव (इंटरॅक्ट अध्यक्षा) यांनीही शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमात हॉकी बेळगावचे मानद कार्यवाह तथा हॉकी प्रशिक्षक श्री. सुधाकर चाळके यांचा रोटरी दर्पणच्यावतीने शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाला सुरेखा मुम्मिगट्टी, सविता वेसणे, शीला पाटील व सुजाता हुनकुंटी यांची विशेष उपस्थिती होती. ‘सेवा हीच खरी प्रतिष्ठा’ या रोटरीच्या तत्वज्ञानाची शपथ घेऊन कार्यक्रमाचा समारोप व आभार प्रदर्शन करण्यात आले.