- जितेंद्र आव्हाड यांनी केला खुलासा
मुंबई : शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या बातम्या आल्या असताना आता जितेंद्र आव्हाड यांनी त्या फेटाळून लावल्या आहेत. जयंत पाटील हेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.
शनिवार, १२ जून रोजी जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून आता शशीकांत शिंदे हे पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष होणार असल्याच्या बातम्या पुढे आल्या होत्या. तसेच लवकरच ते प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्विकारणार असल्याचे सांगण्यात आले.
मात्र, आता हा सगळा खोडसाळपणा असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. त्यांनी आपल्या ‘एक्स’ अकाऊंटवर पोस्ट करत याबाबत खुलासा केला. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “जयंत पाटील साहेब हे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्या राजीनाम्याच्या बातम्या प्रसारीत होणे , हा निव्वळ खोडसाळपणा आहे. पक्ष एका नियमानुसार अन् शिस्तीनुसारच चालत असतो,” असे ते म्हणाले.