बेळगाव : शिवबसवनगर येथील श्री देव दादा मठ ज्योतिर्लिंग देवस्थान परिसरात गुरूवार दि. १० जुलै रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त दगडी चौथऱ्याच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. चैत्र पौर्णिमा यात्रा झाल्यानंतर शिवबसव नगर येथे ” गोलातली ” जत्रा संपन्न होते. त्यावेळी श्री देव दादा सासनकाठीची एका झाडाखाली पूजा केली जाते. तिथे दगडी चौथरा बांधण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार आज गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून भूमिपुजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी सुरेश तारीहाळ, नागेंद्र नाईक ,लक्ष्मण किल्लेकर, प्राचार्य आनंद आपटेकर, ज्योतिबा धामणेकर, श्रीनाथ पवार, ज्योतिबा पवार यांच्यासह श्री ज्योतिर्लिंग भक्त मंडळ, बेळगाव व श्री देव दादा सासनकाठी चव्हाट गल्ली बेळगाव व इतर भक्त उपस्थित होते.