कुद्रेमानी : युवा समिती यांच्यावतीने कुद्रेमानी येथील सरकारी प्राथमिक शाळेतील पहिलीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना मंगळवारी (दि. ८) शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी ग्रा. पं. सदस्य शिवाजी मुरकुटे होते.

प्रारंभी प्रभारी मुख्याध्यापक एस. जी. वरपे यांनी स्वागत केले. विद्यार्थ्यांना मान्यवरांच्याहस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. अ‍ॅड. अश्वजीत चौधरी म्हणाले, सीमाभागातील मराठी संस्कृती टिकविण्यासाठी मराठी माध्यमाच्या शाळा टिकल्या पाहिजेत. पालकांनी मातृभाषेतून शिक्षण देण्याचा प्रयत्न करावा. मराठी संवर्धनासाठी मराठी शाळांतून शैक्षणिक साहित्य वितरणाचा उपक्रम सुरू आहे.

यावेळी एम. बी. गुरव, नागेश राजगोळकर, शिवाजी शिंदे, प्रतीक चौगुले, सुशांत शिंदे, एस. एस. कोळसेकर, जी. एस. गावडे, सी. बी. मडिवाळर, के. बी. पाटील, एल. व्ही. कुट्रे, एस. एस. पाटील, एस. डी. बेळवडी आदी उपस्थित होते. आभार के. एल. गुंजीकर यांनी मानले.