- मण्णूर येथे मातोश्री सौहार्द सोसायटीचे उद्घाटन
मण्णूर : कोणत्याही संस्थेवर समाजाचा विश्वास असणे महत्त्वाचे असते. ठेवीदार कष्ट करून ठेवी ठेवत असतात. त्यांचा विश्वास संस्था मोठी होण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतो. संचालकांनी संस्थेच्या पैशांची उधळपट्टी न करता त्याचा योग्य विनिमय करावा लागतो, असे मत काकती मार्कंडेय सोसायटीचे संचालक अविनाश पोतदार यांनी व्यक्त केले.

मण्णूर येथे मातोश्री सौहार्द सहकारी सोसायटीचे उद्घाटन रविवारी (दि. २२) झाले. यावेळी ते बोलत होते. अविनाश पोतदार यांच्याहस्ते फित सोडून उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक- चेअरमन आर. एम. चौगुले होते.
मातोश्री सभागृहाचे उद्घाटन ठेकेदार एन. एस. चौगुले, शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे अनावरण माजी आमदार मनोहर किणेकर, कॅश काऊंटरचे उद्घाटन तुकाराम बँकेचे चेअरमन प्रकाश मरगाळे, पूजन आर्किटेक असोसिएशनचे चेअरमन कुलदीप हंगिरगेकर, लॉकर पूजन माजी महापौर मालोजी अष्टेकर, पतसंस्था फलक अनावरण जीतोचे अध्यक्ष हर्षवर्धन इंचल यांनी केले.

दीपप्रज्वलन आंबेवाडी ग्रा. पं. अध्यक्षा लक्ष्मी यळगुकर, संजीवनी फाऊंडेशनच्या संस्थापिका सविता देगीनहाळ, रेखा चौगुले, रूपाली जनाज, मराठा बँकेच्या संचालिका रेणू किल्लेकर, गणेशप्रतिमा पूजन मोहन चौगुले, लक्ष्मी प्रतिमेचे पूजन राजशेखर तलवार, राजमाता जिजाऊ प्रतिमा पूजन विनायक चौगुले तर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन रमाकांत कोंडुसकर यांनी केले.
प्रास्ताविक चेअरमन आर. एम. चौगुले यांनी केले. प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. ए. एम. गुरव उपस्थित होते. माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर मालोजी अष्टेकर, एन. एस. चौगुले, रमाकांत कोंडुसकर, माजी महापौर विजय मोरे, रेणू किल्लेकर यांनी शुभेच्छा दिल्या.
व्यासपीठावर ग्रा. पं. माजी अध्यक्ष चेतन पाटील, मदन बामणे, देवस्की पंच कमिटीचे चेअरमन मुकुंद तरळे, अनंत ब्याकुड, उद्योजक श्रीकांत कदम, उद्योजक शिवाजी अतिवाडकर, परशराम कदम, अॅड. एम. जी. पाटील, संजय पाटील, सुरेश राजूकर, डॉ. सी. बी. पाटील, एल. के. कालकुंद्री, सुनील हनमण्णवर उपस्थित होते.
मान्यवरांचे स्वागत व्हा. चेअरमन शांतीसागर कटगेन्नावर, संचालक शंकर सांबरेकर, सचिन मंडोळकर, महेश चौगुले, मनीष कालकुंद्री, परशराम काकतकर, ज्योती मंडोळकर, अन्नपूर्णा चौगुले, नारायण नाईक, सतीश बोंगाळे, शंकर आप्पुगोळ, बाबू कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. अरविंद पाटील, प्रकाश बेळगुंदकर यांनी केले.