- तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे आवाहन
बेळगाव / प्रतिनिधी
१ जून १९८६ साली झालेल्या कन्नड सक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्माना अभिवादन करण्यासाठी रविवार दिनांक एक १ जून रोजी सकाळी ठीक ८.३० वाजता हिंडलगा येथील हुतात्मा स्मारका जवळ अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी, नियंत्रण या घटक समितीच्या कार्यकर्त्यांनी, युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, मराठी भाषिकानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर व सचिव अँड एम. जी.पाटील यांनी केले आहे.