बेळगाव : बेळगुंदी (ता.बेळगाव) येथील रहिवासी तथा बेळगुंदी ग्रामपंचायतीचे माजी उपाध्यक्ष, चेतक काजू फॅक्टरीचे मालक, बालवीर अर्बन संस्थेचे संचालक श्री. सुभाष खाचो हदगल (वय ५६ वर्षे) यांचे गुरुवार दि. ३ एप्रिल रोजी दुपारी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्यावर उद्या शुक्रवार दि. ४ एप्रिल रोजी सकाळी १० वा. बेळगुंदी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, आई – वडील, दोन मुलगे, एक मुलगी, दोन भाऊ, बहीण असा परिवार आहे. बेळगुंदी ग्रामपंचायतीच्या माजी अध्यक्षा आणि विद्यमान सदस्या हेमा हदगल यांचे ते पती होत.