- ओळख पटवण्यासाठी काकती पोलिसांचे आवाहन
- नागरिकांना माहिती देण्याची विनंती
बेळगाव : काकती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मार्कंडेय नदीत एका अनोळखी पुरुषाचा अर्धवट कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. १७ ऑक्टोबर रोजी ही घटना उघडकीस आली असून, मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. या प्रकरणी पोलिसांनी नोंद करून तपास सुरू केला आहे.
काकती येथील रहिवासी मदन सिद्राई कडोलकर यांना नदीत हा मृतदेह आढळला. यानंतर मिळालेल्या तक्रारीच्या आधारे काकती पोलीस ठाण्यात यूडीआर क्रमांक ४३/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १९४(३)(४) अंतर्गत नोंद करण्यात आली आहे. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
मृत व्यक्तीचे वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे असून, उंची सुमारे पाच फूट पाच इंच आहे. मृतदेहावर निळ्या रंगाची ऑफ-व्हाईट पँट आणि चॉकलेटी रंगाची निकर होती. तसेच उजव्या हातावर ‘रॉकी’ हा शब्द लिहिलेला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. मृत व्यक्तीबाबत कोणाकडेही माहिती किंवा काही सुगावा असल्यास बेळगाव शहर पोलीस नियंत्रण कक्षाच्या ०८३१-२४०५२३३ या क्रमांकावर, काकती पोलीस निरीक्षकांच्या ९४८०८०४११५ या क्रमांकावर किंवा आपत्कालीन हेल्पलाइन ११२ वर संपर्क साधावा, असे पोलिसांनी कळवले आहे.








