कावळेवाडी : येथील श्री दूर्गामाता नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात मूहूर्तमेढ रोवण्यात आली.गावातील भजनी मंडळाच्या सहकार्याने टाळ, मृदंगाच्या साथीनं गावातून मूहूर्तमेढ मिरवणूक काढण्यात आली.
सलग तेरा वर्षे मंडळाच्या माध्यमातून नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो. गावडू एम.मोरे यांच्या शुभहस्ते मूहूर्तमेढची विधिवत पूजा करुन रोवण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष गोपाळ जाधव यांनी उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.
यावेळी उत्तम बाचीकर, यल्लापा ओऊळकर, बाळू मोरे, विक्रम बाचीकर, भुजंग मोरे, ज्ञानेश्वर जाधव, किरण यळ्ळूरकर, शेखर मोरे, प्रज्योत ओऊळकर, निवृत्ती कार्वेकर, सुशांत बडसकर, लक्ष्मण मोरे, तसेच मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.








