• पाच खेळाडूंची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

बेळगाव : पदवीपूर्व शिक्षण खाते, बेळगाव आणि के. एल. ई. पदवीपूर्व महाविद्यालय, बैलहोंगल यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव येथील स्पोर्ट्स हॉस्टेलमध्ये आयोजित जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयाच्या कुस्तीपटूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. या स्पर्धेत महाविद्यालयाच्या पाच खेळाडूंनी आपल्या वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंमध्ये श्रावणी पाटील (५९ किलो फ्री स्टाईल), यश शिगेंहळ्ळीकर (६१ किलो फ्री स्टाईल), राजवीर बिर्जे (७२ किलो ग्रीको रोमन), वेदांत मासेकर (८६ किलो फ्री स्टाईल) आणि ध्रुव खाजगोनट्टी (८७ किलो ग्रीको रोमन) यांचा समावेश आहे. याशिवाय प्रतिक पाटील याने ७९ किलो फ्री स्टाईल, तर अबरार अनगोळकर याने ७४ किलो फ्री स्टाईल गटात द्वितीय क्रमांक पटकावला.

या यशस्वी खेळाडूंना विश्वभारत सेवा समिती संस्थेचे सचिव प्रकाश नंदिहळी, महाविद्यालयाचे क्रीडाप्रमुख देवकुमार मंगनाकर तसेच प्राचार्यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंच्या या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.