• ‘क्रॉस्ड ग्लानसिस’ पुस्तकातील चित्रांवर समीक्षक व चित्रकारांकडून चर्चा
  • पॅरिसमध्ये चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्याची घोषणा

बेळगाव : बेळगावचे चित्रकार विकास पाटणेकर यांच्या कलाकृतींवर पॅरिस येथे चर्चासत्र आयोजित करण्यात आले. रोक डी अंथेनर सभागृहात झालेल्या या चर्चासत्रात ‘क्रॉसड ग्लानसिस’ या पुस्तकात प्रकाशित झालेल्या विकास पाटणेकर यांच्या चित्रावर विशेष चर्चा करण्यात आली.

या पुस्तकातील त्यांच्या कलाकृतींचे जगभरातील अनेक समीक्षकांनी कौतुक केले आहे. चर्चासत्रात सहभागी समीक्षक आणि चित्रकारांनी विकास पाटणेकर यांच्या चित्रांविषयी आपली मते व्यक्त करत त्यांच्या कलाकृतींची वैशिष्ट्ये विशद केली.

या कार्यक्रमाचे आयोजन बेनेडिक्त जोबे डुवाल यांनी केले होते. पुढील काळात विकास पाटणेकर यांच्या चित्रांचे पॅरिसमध्ये प्रदर्शन आयोजित करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी जाहीर केले.