- चव्हाट गल्लीतील गणेश मंडळाला भेट देत श्री गणरायाचे घेतले दर्शन
- उत्सवातील सुरक्षा व नियोजनाबाबत चर्चा
बेळगाव : उत्तर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी चव्हाट गल्ली येथील ‘बेळगावचा राजा’ गणेशोत्सव मंडळाच्या श्रीमंडपाला सदिच्छा भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले.
यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संदीप पाटील यांचे स्वागत करून सत्कार केला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सुरक्षा व्यवस्था, शांतता आणि उत्सवाच्या नियोजनाबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संदीप पाटील यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.








