बिजगर्णी : येथील न्यू इंग्लिश हायस्कूल मधील दहावीत शिकणारा विद्यार्थी श्रीनाथ चंद्रकांत निलजकर यांने नुकताच शिक्षण खात्यामार्फत घेण्यात आलेल्या ग्रामीण तालुकास्तरीय सतरा वर्षे खालील वैयक्तिक गोळा फेक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून जिल्हा स्तरावर त्याची निवड झाली आहे.
नेहरू क्रीडा मैदानावर ग्रामीण तालुका पातळीवर स्पर्धा शिक्षण खात्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या शालेय स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या पश्चिम विभाग शिक्षण मंडळ संचलित बिजगर्णी हायस्कूलचा खेळाडू श्रीनाथ चंद्रकांत निलजकर यांने गोळा फेक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून, जिल्हा स्तरावर जिद्द चिकाटीने मजल मारली आहे.ग्रामीण क्रीडाधिकारी साधना भद्री यांच्या हस्ते गौरव पत्र व पदक देऊन सन्मानित करण्यात आले. क्रीडा शिक्षक ए. एम. दरेकर व मुख्याध्यापक रमेश कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल शिक्षकवृंद, संस्था पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.








