• रविवारी गणहोम व महाप्रसादाचे आयोजन
  • गणेशभक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन

कंग्राळी (खुर्द) : रामदेव गल्ली येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाचा ‘कंग्राळीचा महाराजा’ यंदा ४१ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. यानिमित्त मंडळातर्फे गणहोम व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार, २० सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ ते ३ या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. परिसरातील सर्व गणेशभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळातर्फे करण्यात आले आहे.