तुरमुरी (बेळगाव) : मराठी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मला म.गुरव यांना नुकताच शिक्षकदिनाच्या दिवशी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.त्यांनी चौतिस वर्षे ज्ञानदानाचे अविरतपणे पवित्र सेवा बजावली.विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबविले.क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक सामाजिक कार्यात मोलाचं योगदान दिले शिस्त, नम्रता, आत्मविश्वास, उत्तम संस्कारक्षम विद्यार्थी घडवले.आज शेकडो विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत आहेत.

त्यांच्या या कार्याची दखल घेऊन यंदाचा आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्हा स्तरावरील मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.गांधी भवनात आयोजित केलेल्या दिमाखदार सोहळ्यात शिक्षणाधिकारी लिलावती हिरेमठ यांच्या हस्ते श्रीफळ पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह, गौरव पत्र देऊन, आमदार राजू शेट यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. यावेळी तुरमुरी शाळेतील शिक्षकवृंद, शाळा सुधारणा कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.यांच्या या कार्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.