- रमेश पावले यांच्या पुढाकाराने आयोजन
- रमाकांत कोंडुसकर यांच्याहस्ते उद्घाटन
बेळगाव : श्री गणेशाच्या आगमनानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत श्री रमेश पावले दादा यांच्या पुढाकाराने ‘आरती संग्रह पुस्तक वाटप’ हा स्तुत्य उपक्रम उत्साहात पार पडला.
आपली संस्कृती, परंपरा आणि भक्तीभाव घराघरांपर्यंत पोहोचावा, तसेच बाप्पाच्या आरतीचा मंगलमय नाद प्रत्येक घरात घुमावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

उपक्रमाचे उद्घाटन मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेश उत्सव महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत दादा कोंडुसकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित भाविक व नागरिकांना आरती संग्रह पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी महामंडळाचे जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण पाटील, किरण जाधव, गणेश दड्डीकर, कपिल भोसले, मोतेश बारदेशकर तसेच महामंडळाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.








