बेळगाव : बेळगावचे नूतन पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांचे श्रीराम सेना हिंदुस्थान, बेळगाव तालुका यांच्यावतीने स्वागत करण्यात आले. गुरूवारी दुपारी प्रकाश निकम यांनी बेळगाव पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर विविध सामाजिक व संघटनांच्या वतीने त्यांचे स्वागत करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर श्रीराम सेना हिंदुस्थान, बेळगाव तालुका यांच्या वतीने पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बेळगाव तालुका अध्यक्ष भरत पाटील, संदीप जक्काने, एम. डी. पाटील, शिवा पुजारी, दिलीप कुंडूस्कोप, सचिन कदम, ओमकार मेलगे, रोहन पाटील आणि मारुती पाटील यांच्यासह श्रीराम सेना हिंदुस्तानचे कार्यकर्ते उपस्थित होते.
नूतन पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली बेळगाव शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम होईल,अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.








