बेळगाव : शहरातील सार्वजनिक शांतता आणि कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण केल्याच्या आरोपावरून सुरेश मुनिस्वामी जालगार (वय ४१, रा. कपिलेश्वर मंदिरामागे, जालगार गल्ली, बेळगाव) याच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सुरेश जालगार हा सन २००५ पासून आपल्या साथीदारांसह मारामारी, लुटमार, जुगार तसेच बेकायदेशीर जमाव करून शस्त्रास्त्रे बाळगणे आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्यासारख्या बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असल्याचे आढळून आले आहे. त्याच्याविरुद्ध बेळगाव शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण सहा गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्यानंतरही त्याच्या बेकायदेशीर कारवाया सुरूच राहिल्याचा आरोप आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे पोलिसांनी नमूद केले.
August 20, 2026
न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार बेळगाव : न्यायालयीन कामकाजादरम्यान वकिलांशी कथित गैरवर्तन केल्याच्या निषेधार्थ बेळगाव बार असोसिएशनच्या वतीने गुरुवारी सर्व न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकत निदर्शने करण्यात आली. विशेषतः […]







