टिळकवाडी : शांतीनगर, स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान येथे ८० वा भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. माजी उपमहापौर आनंद चव्हाण यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने डॉ. विक्रम नाईक यांना नुकताच गणित विषयात पीएचडी संपादन केल्याबद्दल तसेच निवृत्त मुख्याध्यापक एन. डी. पाटील व वाय. पी. नाईक यांची अखिल भारतीय नाईक रामोशी समाज‌ विकास परिषद पुणे विभाग उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माजी उपमहापौर आनंद चव्हाण व पी. एन. बेळीकटी यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी नारायण आपटेकर, विलास काळे, नागेश नाईक, दयानंद भेंडीगेरी, लक्ष्मण वालीकर, सुशांत कडागंळे संजय रायकर, गणपती कब्बूर, विलास बसरीमरद, सुमेधा काळे,सुमन‌ दळवी, सुरेखा काळे, राहुल कांबळे, शिक्षक आसिफ आत्तार, उमा परदेशी आदी मान्यवरांसह नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.