- ‘शॉपिंग उत्सव’ आणि फॅशन अँड लाइफस्टाईल प्रदर्शनाला आवर्जून भेट द्या
- एकाच छताखाली विविध वस्तूंच्या खरेदीची संधी
- ईव्ही ऑटो शोचे खास आकर्षण
बेळगाव : यश कम्युनिकेशन व यश इव्हेंट्स यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘शॉपिंग उत्सव – फॅशन अँड लाइफस्टाईल प्रदर्शन व विक्री’ ला बेळगावकरांनी आवर्जून भेट देऊन विविध आकर्षक वस्तूंच्या खरेदीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. टिळकवाडी येथील मिलेनियम गार्डन, बीएससी मॉलशेजारी १४ ते १८ ऑगस्टदरम्यान हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
या प्रदर्शनात एकाच छताखाली ग्राहकांच्या दैनंदिन जीवनासाठी उपयुक्त विविध वस्तू उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. फॅशन आणि लाइफस्टाईलशी संबंधित ड्रेसेस, साड्या, ड्रेस मटेरियल, ज्वेलरी, पर्स, गिफ्ट आर्टिकल्स, बेडशीट्स यांसह फर्निचर, हर्बल उत्पादने, हेअर ऑईल, मसाले, मिलेट उत्पादने, बेकरी पदार्थ आणि विविध स्वादिष्ट खाद्यपदार्थांची खरेदी करता येणार आहे.
नवीन फॅशन ट्रेंड्स, आकर्षक उत्पादने आणि वाजवी दरांचा अनुभव घेण्यासाठी हे प्रदर्शन नागरिकांसाठी विशेष पर्वणी ठरणार आहे. कुटुंबीय व मित्रपरिवारासह प्रदर्शनाला भेट देऊन मनसोक्त खरेदी करण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.
या शॉपिंग उत्सवाचे खास आकर्षण ‘ईव्ही ऑटो शो’ असून, विविध प्रकारच्या इलेक्ट्रिक दुचाकी प्रदर्शनात पाहता येणार आहेत. त्यामुळे खरेदीसोबतच इलेक्ट्रिक वाहनांची माहिती घेण्याची संधीही ग्राहकांना मिळणार आहे.
१४ ते १८ ऑगस्टदरम्यान मिलेनियम गार्डन, बीएससी मॉलशेजारी, टिळकवाडी येथे सुरू असलेल्या या शॉपिंग उत्सवाला बेळगावकरांनी आवर्जून भेट देऊन खरेदीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९३४११०९६३५, ९२४२३५०१९७ या क्रमांकांवर संपर्क साधता येणार आहे.







