सुळगे (ये.) : येथील नेताजी हायस्कूलमध्ये गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून गुरुवंदन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. गुरुपौर्णिमा दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थी – विद्यार्थिनींच्याहस्ते मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा गुलाबपुष्प व पेन देऊन यथोचित्त गौरव करण्यात आला.
यानंतर शाळेच्या विद्यार्थिनी कु. प्रियांका मल्लाप्पा नरवाडे व कु.श्रावणी जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. तर समाजविज्ञान विषयतज्ञ श्री.एम.पी.कंग्राळकर सर यांनी आपल्या भाषणातून महर्षी वेदव्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार होते. भारतीय संस्कृतीची मूळ संकल्पना आणि तिची जोपासना महर्षी वेदव्यासांनीच केली आहे. पूर्वी वेद हा एकच होता ऋषिव्यासांनी वेदांचे नीटपणे विभाजन करून त्याचे संपादन केल्याची माहिती दिली.
अध्यक्षीय समारोपात मुख्याध्यापक श्री.टी.वाय.भोगण सर यांनी परशुराम आणि कर्ण (गुरु आणि शिष्य) यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.सेजल मधुकर थोरवत हिने तर आभार कु.श्रुती भाऊराव होनगेकर हिने मानले. या कार्यक्रमाला नेताजी हायस्कूलचे सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








