बेळगाव / प्रतिनिधी

आधार एज्युकेशन सोसायटी संचालित जोशी सेंट्रल पब्लिक स्कूल मध्ये किशोरवयीन विद्यार्थ्यांना विविध विषयांवरील मौलिक मार्गदर्शन कार्यक्रम नुकताच पार पडला.

यामध्ये किशोरवयीन अवस्था, वैयक्तिक सुरक्षा आणि पॉक्सो कायद्यावर जागरूकता कार्यक्रम यावेळी घेण्यात आला. पौगंडावस्थेतील मानसिकता, चांगला स्पर्श,वाईट स्पर्श आणि . वैयक्तिक सुरक्षा यांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. किशोरवयीन अवस्थेतील भावनिक आणि शारीरिक बदल, तसेच बाल संरक्षणाचे महत्त्व याबद्दल विद्यार्थ्यांना स्क्रीन वरील सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.

शिवबसवज्योती होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज मधील तज्ज्ञ, डॉ. नूतन गुणदाळ आणि डॉ. अस्मिता पाटील यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. अरुण जाधव यांनी अध्यक्षीय विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश्वरी तरबर यांनी केले. गीता इटगी आणि सहना प्रभू यांनी व्याख्यात्यांची ओळख करून दिली. कार्यक्रम संयोजनासाठी शिक्षक वर्गाने परिश्रम घेतले.