- रोटरी वर्ष २०२६–२७ साठी नूतन कार्यकारिणी कार्यरत
- समाजसेवेची नवी दिशा देण्याचा संकल्प
बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणचा रोटरी वर्ष २०२६–२७ साठीचा पदग्रहण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या समारंभातून सेवा, मैत्री आणि समाजहिताच्या कार्याला नव्या नेतृत्वाखाली नवी दिशा मिळाली.
शनिवार, दि. २७ जून २०२६ रोजी आयोजित या समारंभात रोटेरियन डॉ. स्फूर्ती मस्तीहोळी यांनी अध्यक्षपदाची, रोटेरियन ज्योती कुलकर्णी यांनी सचिवपदाची, तर रोटेरियन उर्मिला गाणी यांनी कोषाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी रोटरीचे सदस्य, मान्यवर आणि निमंत्रित मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान सर्व सदस्यांनी रोटरीच्या “Service Above Self” या ब्रीदवाक्याप्रती आपली निष्ठा आणि सेवाभाव पुन्हा अधोरेखित केला. समाजोपयोगी उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
समारोपावेळी नव्या पदाधिकाऱ्यांनी समाजहिताचे विविध सेवा प्रकल्प राबविणे, मैत्री आणि सहकार्याची भावना अधिक बळकट करणे तसेच रोटरीच्या सेवाधर्माला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त केला.








