बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रकाश मरगाळे यांचा शिवसेना (उबाठा) कोल्हापूर सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम मध्यवर्ती कार्यालय, रामलिंगखिंड गल्ली येथे पार पडला.

यावेळी बेळगाव सीमाभाग शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, तालुकाप्रमुख सचिन गोरले, माजी महापौर मलोजी अष्टेकर, महेश टकसाळे, राजू बोकडे राजू कनेरी, श्रेयस आणि रमेश माळवी उपस्थित होते.