- श्री. मारूती बसवंत बाळेकुंद्री यांचे निधन
धामणे (एस.) : बसवाण गल्ली येथील रहिवासी तथा माजी ग्रा. पं. सदस्य श्री. मारूती बसवंत बाळेकुंद्री (वय ७८) यांचे आज सोमवार दि. १३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. धामणे गावचे माजी ग्रा. पं. सदस्य श्री. विजय बाळेकुंद्री यांचे ते वडील होत.
त्यांच्या पश्चात तीन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. अंत्यसंस्कार आज दुपारी १ वा. धामणे स्मशानभूमीत होणार आहे.








