बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव येथील हिरेबागेवाडी पोलिसांनी कुकडोळ्ळी गावात मटका जुगारावर छापा टाकत एका इसमाला अटक केली. या कारवाईत होन्नप्पा बसप्पा कोलकार (वय ४५, रा. बसवनगर, दारिशवाड, बेळगाव) याला ताब्यात घेण्यात आले.

हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याचे पीएसआय अविनाश ए. व्ही. आणि त्यांच्या पथकाने ही धाड टाकली. छाप्यात आरोपीकडून रोख रक्कम तसेच जुगारासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या कारवाईबद्दल पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी संबंधित पथकाचे कौतुक केले आहे.