• कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन

बेळगाव / प्रतिनिधी

२५ ऑक्टोबर २०२१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठी कागदपत्रांसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आयोजित महामोर्चा पोलिसांनी धर्मवीर संभाजी महाराज चौकात अडवला होता. यावेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी चौकातच धरणे धरून ठाम राहून घोषणाबाजी केली होती.

मोर्चा दरम्यान पोलिसांनी कोरोना काळाचा आधार घेत नेते व कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला होता. या खटल्यातील अनेक कार्यकर्ते न्यायालयात नियमित गैरहजर राहत आहेत. हा खटला क्रमांक १४५/२०२१, पाचवे अतिरिक्त न्यायालय बेळगाव येथे सुनावणीसाठी पुढील तारीख मंगळवार, २४ मार्च २०२६ निश्चित करण्यात आली आहे. वकील महेश बिर्जे व समितीने सर्व कार्यकर्त्यांना सकाळी १०.३० वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. न्यायालयाने वरचेवर गैरहजर राहणार्‍यांवर अटक वॉरंट जारी करण्याची सक्त ताकीद दिली आहे.

खटल्यात उपस्थित राहण्याचे आव्हान करण्यात आलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये मनोहर कल्लाप्पा किनेकर, प्रकाश आप्पाजी मरगाळे, शुभम विक्रांत शेळके, प्रकाश रामचंद्र शिरोळकर, किरण गोविंदराव गावडे, रेणू सुहास किल्लेकर, सरिता विराज पाटील, श्रीकांत नाथाजी मांडेकर, रवी महादेव साळुंखे, धनंजय राजाराम पाटील, मदन बाबुराव बामणे, मालोजी शांताराम अष्टेकर, नेताजी नारायण जाधव, बंडू शंकर केरवाडकर, गजानन पाटील, संदीप सुभाष चौगुले, दिगंबर मारुती कातकर, परेश गोपाळ शिंदे, विनायक यल्लाप्पा सांबरेकर, हनुमंत कृष्णा मजुकर, रामचंद्र शंकर कुद्रेमणीकर, विनायक बाळकृष्ण पावशे, नागेश बळीराम किल्लेकर, उदय नारायण नाईक, अनिल बबन हेगडे, माधुरी अनिल हेगडे, संदीप काशिनाथ मोरे, मल्हारी पावशे, चेतन परिस पाटील, कृष्णा भरमा गुरव यांचा समावेश आहे.

सर्व कार्यकर्त्यांनी वेळेत उपस्थित राहून खटल्याची सुनावणी पूर्ण करण्यास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.