कावळेवाडी : येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही तुकाराम बीजच्या पावन निमित्ताने ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. संत ज्ञानेश्वर पारायण मंडळ, कावळेवाडी व भजनी मंडळाच्या संयुक्त विद्यमाने हा तीन दिवसीय सोहळा साजरा होत आहे.

दि. २३ फेब्रुवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत पारायणाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. दि. ४ मार्च रोजी ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज यांच्या मूर्तींची गावातून टाळ-मृदुंगाच्या गजरात भव्य दिंडी काढण्यात आली. या वेळी हभप मारुती पाटील, जोतिबा मोरे, संजय ओऊळकर, मारुती बाचीकर, गंगुबाई मोरे, भरमाणा मोरे, लक्ष्मण जाधव, वाय. पी. नाईक, पांडुरंग मोरे, ह.भ.प. श्रीधर पाटील (हंगरगा), परशराम पाटील (सावगाव), मोणापा मोरे, काशिनाथ मोरे, भावकाणा गावडा आदी उपस्थित होते.

दि. ५ मार्च रोजी अधिष्ठान हभप मारुती पाटील व उप-अधिष्ठान हभप शिवाजी जाधव महाराज यांच्या उपस्थितीत प्रवचन हभप यल्लापा लोहार (आंबेवाडी) यांचे झाले, तर किर्तन निरुपण यल्लापा पाटील महाराज (सावगाव) यांनी केले.

दि. ६ मार्च रोजी महिला भजनी मंडळ, हरिपाठ तसेच रात्री दीपोत्सवाचे आयोजन मोहन मोरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे. दीपोत्सवाचे मानकरी शरद पाटील, जोतिबा फगरे, अॅड. नामदेव मोरे, भाऊराव मोरे, गोपाळ पाटील, मोणापा भास्कर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. किर्तन हभप प्रा. संदीप हातकर (आजरा) यांचे होणार आहे.

दि. ७ मार्च रोजी हभप मारुती पाटील (मंडोळी) यांचे काला किर्तन, मंडपाभोवती प्रदक्षिणा आणि महाप्रसादाने पारायणाची सांगता होणार आहे. या अध्यात्मिक सोहळ्याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पारायण मंडळातर्फे करण्यात आले आहे.