- श्री. एन. ओ. चौगुले यांचा सत्कार
उचगाव / वार्ताहर
उचगाव येथील मध्यवर्ती गांधी चौकात दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन सोहळ्यांचे गेल्या ४५ वर्षांपासून सूत्रसंचालन करत असलेल्या श्री. एन. ओ. चौगुले सर यांनी यंदा २६ जानेवारी रोजी आपल्या कारकिर्दीतील ५० वा प्रजासत्ताक दिन कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.
१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी वर्षातून दोन वेळा गावातील मुख्य ध्वजारोहण सोहळ्यांचे सूत्रसंचालन करत चौगुले सरांनी अखंड राष्ट्रभक्तीचा संदेश प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचवला आहे. त्यांच्या प्रभावी आणि निवेदनामुळे राष्ट्रीय सणांचे औचित्य आणि गौरव अधिकच वाढत असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे.
या दीर्घकालीन सेवाभावी योगदानाबद्दल उचगाव ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांच्या वतीने चौगुले सरांचा जाहीर सत्कार करण्यात आला. सत्कार सोहळ्यास ग्रामपंचायत पदाधिकारी, मान्यवर नागरिक आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







