सुळगा (हिं.) : मारुती गल्ली येथील रहिवासी तथा युवा सामाजिक कार्यकर्ते कु. मदन मोनाप्पा पाटील (वय ३६) यांचे आज शुक्रवार, दि. ९ जानेवारी २०२६ रोजी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई-वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे. त्यांच्यावर आज सायंकाळी ७ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मदन पाटील हे गावातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रेसर राहून कार्य करत असत. श्री ब्रह्मलिंग मंदिर, श्री मसनाई देवी मंदिर तसेच मागील आठवड्यात झालेल्या स्मशानभूमीच्या सौंदर्यीकरणाच्या कामातही त्यांनी श्रमदान करून मोलाचा सहभाग दिला होता. त्यांच्या अकाली निधनामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.