कावळेवाडी : येथील गुणवंत बाल धावपटू प्रेम यल्लापा बुरुड याने म्हैसूर येथे झालेल्या ६०व्या क्रॉस कंट्री स्पर्धेत दोन किमी अडथळा शर्यतीत ५ मिनिटे ४३ सेकंदांत सुवर्णपदक पटकावत राष्ट्रीय स्तरावर निवड मिळवली आहे. ही राष्ट्रीय स्पर्धा २४ जानेवारी रोजी रांची (झारखंड) येथे होणार आहे.

सध्या प्रेम मद्रास रेजिमेंट स्पोर्ट्स सेंटर, विलिंग्डन (उटी) येथे नववीत शिक्षण घेत असून प्रशिक्षण घेत आहे. प्रतिकूल परिस्थितीतून हे यश मिळवणाऱ्या प्रेमचे सर्वत्र कौतुक होत असून कावळेवाडी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनीही ५ हजार रुपयांचे आर्थिक सहकार्य करून त्याला प्रोत्साहन देत कौतुकाची थाप देऊन सन्मानित केले आहे.

यावेळी संतोष दरेकर, वाय. पी.नाईक, ॲड. नामदेव मोरे, एस. आर. मोरे, वनिता कणबरकर,राजू ना. बुरुड, केदारी कणबरकर,पी. पी. बेळगावकर, रामचंद्र बडसकर शाळेतील सर्व शिक्षकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.