सुळगा (हिं.) : लक्ष्मी गल्ली येथील रहिवासी श्री. देवाप्पा ठाणू पाटील (वय ८३) यांचे बुधवार दि. ३१ डिसेंबर २०२५ रोजी मध्यरात्री १२ वा. वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. ते शेतकरी शिक्षण सेवा समिती संचलित, ब्रह्मलिंग हायस्कुल सुळगा (हिं.) चे अध्यक्ष तसेच ब्रह्मलिंग को – ऑप. सोसायटी लि. सुळगा (हिं.) चे संस्थापक होते. आज बुधवारी सकाळी ११ वा. सुळगा (हिं.) स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. रक्षाविसर्जन गुरुवार दि. १ जानेवारी २०२६ सकाळी ८ वा. होणार आहे.
December 31, 2025
कावळेवाडी : येथील गुणवंत बाल धावपटू प्रेम यल्लापा बुरुड याने म्हैसूर येथे झालेल्या ६०व्या क्रॉस कंट्री स्पर्धेत दोन किमी अडथळा शर्यतीत ५ मिनिटे ४३ सेकंदांत सुवर्णपदक […]








