उचगाव / वार्ताहर
बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील बेकिनकिरे गावात सुमारे २ कोटी ६० लाख रुपयांच्या खर्चाने होणाऱ्या रस्ते व विविध बांधकामाच्या कामाचे भूमिपूजन महिला व बालकल्याण विकासमंत्री सौ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक लोकप्रतिनिधींसह पार पडले आणि कामाला प्रारंभ करण्यात आला.
यावेळी युवक काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर, काडा अध्यक्ष युवराज कदम व गावातील ज्येष्ठ नागरिक, स्थानिक लोकप्रतिनिधी, रहिवासी तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.









