बेळगाव : न्यू गुडस शेड रोड चौथा क्रॉस येथील रहिवासी आणि प्रसिद्ध आंब्याचे व्यापारी सुनील दत्तात्रय बर्डे (वय ७९) यांचे बुधवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. उद्योजक विकास बर्डे यांचे ते बंधू होत. अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी अनेक समाजपयोगी कार्य केले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांचावर उद्या गुरुवारी सकाळी अकरा वाजता शहापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे.