बेळगांव : येथील प्रगतिशील लेखक संघाचे पाचवे मराठी साहित्य संमेलन रविवार दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे. ‘प्रगतिशील ‘च्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत अध्यक्ष प्रा. आनंद मेणसे यांनी ही माहिती दिली. खानापूर रोड, (रेल्वे ओव्हर ब्रीजजवळ) येथील श्री. तुकाराम महाराज सामाजिक व सांस्कृतिक भवन येथे हे संमेलन होणार आहे. संमेलनाध्यक्षांची निवड लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. विविध चार सत्रात परिसंवाद, विशेष व्याख्यान व कवी संमेलन होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
आजवरची संमेलने महात्मा जोतिबा फुले, महात्मा गांधी, आचार्य अत्रे व साने गुरुजी यांचे विचार व कार्य या मध्यवर्ती संकल्पनेवर झाली आहेत.
December 6, 2025
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे आवाहन बेळगाव : कर्नाटक सरकारच्यावतीने बेळगावमध्ये दि. ८ डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशन भरविण्यात येणार असून सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना मागील काही […]








