बेळगाव : हिंदवाडीचे रहिवासी आणि दानशूर उद्योजक, बी. टी. पाटील (पॅटसन) उद्योग समूहाचे शिल्पकार बाळासाहेब भरमगौडा पाटील (वय ९३ वर्षे) यांचे आज पहाटे वार्धक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन कर्ते चिरंजीव सचिन व तुषार, विवाहित कन्या, सुना, जावई, नातवंडे, बंधू प्रभाकर पाटील आणि बहिण शालिनी लडगे असा मोठा परिवार आहे. मार्कंडेय सहकारी साखर कारखाना उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. याचबरोबर पंचवीस वर्षापासून महावीर को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमनपद त्यांनी भूषवले होते. सुंदराबाई पाटील बीएड कॉलेज, महावीर भवन आदी संस्थांच्या उभारणीत व जैन समाजाच्या विकासात त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. त्यांच्या निधनाने एका थोर उद्योग समूहास बेळगावची जनता मुकली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी एक वाजता शहापूर समूह स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
March 17, 2026
हिंडलगा येथे स्वच्छता मोहीम पर्यावरण जनजागृतीलाही चालना बेळगाव / प्रतिनिधी बेळगावातील मार्कंडेय नदीच्या संरक्षण आणि पुनरुज्जीवनासाठी कर्नाटक राज्य शेतकरी संघटना तसेच ‘मार्कंडेय वाचवा’ पथकाने पुढाकार घेत […]








