- डीसीसी बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची कडक उपाययोजना
- दुपारी १२ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत निर्बंध कायम
बेळगाव / प्रतिनिधी
डीसीसी बँक निवडणुकीच्या मतदान आणि निकालाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस विभागाने बेळगावात कडक सुरक्षा बंदोबस्त ठेवला आहे.
शहरातील बीके मॉडेल स्कूल परिसरात आज (रविवार) दुपारी १२ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत कलम १४४ आणि बीएनएस १६३ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत, अशी माहिती शहर पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली.
आयुक्तांनी सांगितले की, शाळेच्या २०० मीटर परिसरात कोणतेही जमावबंदीचे उल्लंघन, घोषणाबाजी किंवा फटाके फोडणे पूर्णपणे निषिद्ध आहे. मतदान व निकालाच्या वेळी शांतता राखण्यासाठी ५०० पेक्षा अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
शहरात शिस्त व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल, असा इशारा देण्यात आला आहे.