- सामाजिक कार्यकर्ते सुनील आवडण यांचा पुढाकार
सुळगा (उ) / वार्ताहर
सुळगा (उ) येथील श्री सिमेदेव युवक मंडळामार्फत सामाजिक कार्यकर्ते सुनील शंकर आवडण यांच्या प्रयत्नाने गावातील मंदिरांचे तसेच स्मारकांचे सुशोभिकरण करण्यासाठी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. सोमवार, दि. २९ रोजी ब्रह्मलिंग मंदिरात ही रक्कम औपचारिकरित्या देवस्की पंच कमिटीकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी कमिटीने सुनील आवडण यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.


सत्कारानंतर आपले विचार व्यक्त करताना सुनील आवडण म्हणाले की, “मंदिरे ही केवळ उपासनेची केंद्रे नसून आपल्या परंपरा, संस्कृती आणि सामाजिक एकतेचे प्रतीक आहेत. गावातील सण-उत्सव व सांस्कृतिक कार्यक्रम मंदिरांमुळे एकत्रित साजरे होतात. त्यामुळे एकोपा निर्माण होतो.” या विचारातूनच गावातील मंदिरांच्या सुशोभिकरणासाठी आर्थिक मदत करण्याचा संकल्प केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
- मदतीचा तपशील :

सुनील आवडण हे सतत सामाजिक कार्यात पुढाकार घेत असून, युवा पिढीवर चांगले संस्कार व्हावेत यासाठी ते सक्रियपणे प्रयत्नशील आहेत. श्री सिमेदेव युवक मंडळाच्या स्थापनेपासून त्यांनी मंडळाच्या कार्यात मोठे योगदान दिले आहे. नवरात्रोत्सवासारख्या सांस्कृतिक सोहळ्यांबरोबरच सामाजिक उपक्रमांमध्येही मंडळ अग्रेसर आहे. भाविकांकडून मंडळाला मिळणाऱ्या देणग्यांपैकी आवश्यक तेवढा निधी मंडळासाठी वापरून उर्वरित रक्कम समाजोपयोगी कार्यासाठी वापरण्याचा त्यांचा दृष्टिकोन युवा पिढी आणि इतर युवक मंडळांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. याबद्दल गावात सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
